"एक जिज्ञासू मानसिकता स्वीकारा आणि प्रश्न करणे व समजून घेणे कधीही थांबवू नका."
- अल्बर्ट आईन्स्टाईन
येणाऱ्या काळातील कार्यक्रम
"एज्यु-प्रेन्योर" प्रशिक्षण वर्ग
विज्ञान शिक्षण माध्यमातून समाजमनात वैज्ञानिक मानसिकता रुजवण्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने उद्योजक उपक्रम सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी
"बालनगरी" आणि "सायन्स क्वेस्ट" वर्ग
विज्ञान प्रयोगांद्वारे विज्ञानातील मूलभूत संकल्पनांचे स्पष्टीकरण करणे व मुलांमध्ये निरीक्षण क्षमता वृद्धिगंत होऊन विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणारा उपक्रम (वयोगट : 6 ते 12 वर्षे)
विज्ञानविषयक विविध संसाधने
1000 हून अधिक विज्ञान पुस्तकांचा संग्रह तसेच विज्ञान कोष – मासिके उपलब्ध असलेले ग्रंथालय आणि वाचनालय , इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स लॅब, भौतिक – रसायन – जीवशास्त्रातील विविध प्रयोग साहित्यांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा
आपले अपेक्षित सहकार्य
- परिषदेचे वार्षिक सभासद बनून सक्रिय योगदान देणे.
- विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवणे.
- उपक्रमांना वस्तू अथवा आर्थिक रूपाने मदत करणे.
