संसाधने
1000 हून अधिक विज्ञान पुस्तकांचा संग्रह तसेच विज्ञान कोष – मासिके उपलब्ध असलेले ग्रंथालय आणि वाचनालय , इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स लॅब, भौतिक – रसायन – जीवशास्त्रातील विविध प्रयोग साहित्यांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा
ग्रंथालय आणि वाचनालय
1000 हून अधिक विज्ञान पुस्तकांचा संग्रह तसेच विज्ञान कोष – विज्ञान मासिके उपलब्ध असलेले सुसज्ज ग्रंथालय आणि वाचनालय परिषदेच्या आवारात आहे. 500 रु. वार्षिक शुल्क भरून कोणीही विद्यार्थी/ नागरिक ग्रंथालय- वाचनालयाचे सभासद होऊ शकतो. सभासदत्व अर्ज दाखल करण्यासाठी खालील बाटणावर क्लिक करा.


अरुणोदय प्रयोगशाळा
प्रयोग म्हणजे विज्ञानाचा आत्मा. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना आणि समाजातील इच्छुकांना स्वतःच्या हाताने वेगवेगळे प्रयोग करायला मिळाले तर विज्ञानाची आवड निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. यासाठीच हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भौतिक – रसायन – जीवशास्त्रातील विविध प्रयोग येथे करता येतात. डॉ. होमी भाभा बलवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेतील दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांची (इयत्ता – 6वी आणि 9वी ) प्रात्यक्षिक कार्यशाळा देखील घेतल्या जातात.
इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स लॅब
विनोद गाडगीळ प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून, प्रयोगशाळेत प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. याअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स वर्ग घेण्यात येतात तसेच एकदिवसीय कार्यशाळा देखील घेतल्या जातात.
