
परिचय
मराठी विज्ञान परिषद नाशिक विभाग (परिषद) समाजात विज्ञान प्रसाराचे काम करते. चिकित्सक विचार प्रक्रियेला जोपासणे, संपूर्ण समाजात तथ्यावर आधारित तर्कशुद्ध वातावरण निर्माण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी परिषद सतत प्रयत्नशील आहे. परिषदेचे कामकाज प्रामुख्याने लोकभाषा/ मातृभाषा मराठीत होत असते. तथापि, इंग्रजी न वापरण्याचा अट्टहास अजिबात नसून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा इंग्रजीमध्ये देखील कार्यक्रम आयोजित केले जातात.
परिषदेचे उद्दिष्ट
विज्ञानाच्या प्रगती करता आयुष्य वेचणारे संशोधक, शास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रेमी यांनी विज्ञानप्रसार प्रामुख्याने लोकभाषेतून /मातृभाषेतून करण्याच्या उद्देशातून स्थापना.
- विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे.
- विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे.
- विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे.
- वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे.
ध्येय
चिकित्सक विचार प्रक्रियेला जोपासणे, संपूर्ण समाजात तथ्यावर आधारित तर्कशुद्ध वातावरण निर्माण करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे.
- विज्ञानाचे उपयोजन ओळखणे व त्यातील त्रुटी दूर करणे.
- जीवनातील विविध संबोधांचे शास्त्रीय अर्थ समाजात रुजवणे.
- विज्ञानाधारीत तंत्रज्ञानावारील अंधश्रद्धा दूर करणे.
- समाजातील अवैज्ञानिकता दूर करून वैज्ञानिक मानसिकता रुजवणे.
परिषदेची वाटचाल
डॉ. रा.वि.साठे, प्रा. भा.मा.उदगावकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, श्री. प्रभाकर देवधर, श्री. अ. पां.देशपांडे यांसारखे अनेक विज्ञानव्रती आणि असंख्य विज्ञानप्रेमींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ७०हून अधिक स्वायत्त विभागांमार्फात मराठी विज्ञान परिषद कार्यरत असून, नाशिक विभाग त्यापैकीच एक होय. सुरुवातीपासून विभागाची आजपर्यंतची वाटचाल पुढीलप्रमाणे आहे.
- १९६७ – गो. ग. गुजराती सरांच्या प्रयत्नातून सुरुवात.
- १९९० – प्राचार्य चौरे सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यविस्तार.
- २००६ – दिगंबर गाडगीळ, अरुण फाळके, डॉ. नवनीत गुजराथी या त्रयींच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रमांची जोड.
- २०१२ – परिषदेची लिखित घटना व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी.
- २०१५ – मराठी विज्ञान परिषदेच्या सर्व विभागांतून सन २०१५-१६ सालचा सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून गौरव.
- २०२३ – करोना पश्चात नावीन्यपूर्ण उपक्रमांना चालना
घटना व कार्य
मराठी विज्ञान परिषद नाशिक विभागाची स्थापना १९६७ साली झाली. परिषद एक सामाजिक संस्था असून तिचे सर्व कामकाज तिच्या लिखित घटनेनुसार चालते. दरवर्षी परिषदेचे हिशेब तपासले जाऊन ते वार्षिक सभेपुढे मांडले जातात. विविध कायद्यांतर्गत झालेली परिषदेची नोंदणी –
- सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६० नुसार क्र.: महा. /८५४ /११ /नाशिक (दिनांक १६-१२-२०११)
- बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार क्र.: फ – १३४६० (नाशिक) (दिनांक २९-०२-२०१२)
- सीएसआर देणग्यांसाठीः CSR प्रमाणपत्र क्रमांकः CSR00042177 (दिनांक ०२-१२-२०२२)
- परिषदेला दिल्या जाणाऱ्या देणग्या या कलम ८०-जी नुसार आयकर सवलतीस पात्र आहेत. ऑर्डर क्र. ३८१/ २०१७-१८/४४७७ ( दिनांक २२-११-२०१७)
व्यवस्थापन
परिषदेच्या कार्यकारिणीवरील सदस्यांची संख्या एकूण आठ असून परिषदेचे दैनंदिन काम व्यवस्थापन समन्वयक आणि एक सहाय्यक पाहत असतात. परिषदेच्या कामाची आखणी कार्यकारिणी करत असते. सर्व कार्यकारिणी सदस्य स्वयंसेवी वृत्तीने या कामात सहभागी असतात. विविध स्वरूपाच्या वैयक्तिक तसेच संस्थांद्वारे मिळणार्या देणग्या, कार्यक्रमांतून मिळणारे शुल्क, सभासद वर्गणी, इत्यादी परिषदेच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत.
धनंजय पोपटराव अहिरे (अध्यक्ष)

होमिओपॅथी चिकित्सक
श्रद्धा राजेश वाळवेकर (उपाध्यक्ष)

स्त्रीरोगतज्ज्ञ
अजित गुरुपाद टक्के (कार्यवाह)

बांबू तंत्रज्ञ
शितल वसंत चौगुले (कोषाध्यक्ष)

वास्तुविशारद
तृप्ती योगेश बक्षी (सह कार्यवाह)

शिक्षिका
सुनील यादवराव कुटे (सदस्य)

पुणे विद्यापीठ सिनेट सभासद
चित्रा भरत भोळे (सदस्य)

कृतिशील कार्यकर्ता
विजय दत्तात्रय कुलकर्णी (सदस्य)
लेखापाल
गणेश बागुल (व्यवस्थापन समन्वयक)

अभियंता
गायत्री नेरे (समन्वयक)

कृतिशील कार्यकर्ता