परिषदेमार्फत आयोजित होणारे उपक्रम

मराठी विज्ञान परिषद नाशिक विभागामार्फत विद्यार्थांसाठी विज्ञान व त्यासंबधी कुतुहल जागृत करणारे कार्यक्रम, तसेच शिक्षक, पालक व नागरिकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित  केले जातात.

कुतूहल - जिज्ञासा वर्ग

गणित व विज्ञानाचे प्रयोग व प्रकल्प, खेळातून विज्ञान, सर्वेक्षणं, कृती संशोधन, आकाश दर्शन, प्रतिकृति बनवणे, विज्ञान सहल अशा अनेक उपक्रमांचा समावेश असलेला वर्षभर चालणारा वर्ग.

निसर्ग विज्ञान कार्यशाळा

निसर्ग, समाज आणि विज्ञानातील सत्य-असत्य, योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक ओळखून योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेला चालना देणारा उपक्रम.

इतिहास भूगोल कार्यशाळा

इतिहास व भूगोल रंजक पद्धतीने मुलांसामोर मांडून या विषयात आवड निर्माण करून दैनंदिन जीवनात वापर करण्यासंदर्भात जाणीव निर्माण करणारा उपक्रम.

डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षा मार्गदर्शन

डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा तसेच विज्ञानविषयक अन्य परीक्षांसाठी प्रात्यक्षिक कार्यशाळा आणि कृती संशोधन प्रकल्प मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येतात.

इलेक्ट्रॉनिक्स व रोबोटिक्स वर्ग

इलेक्ट्रॉनिक सर्किट बिल्डिंग, पीसीबी मेकिंग, सोल्डरिंग, इलेक्ट्रॉनिक डिवाइस फंक्शनिंग, रोबोटिक्स फाउंडेशन, इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट इत्यादि तंत्रज्ञानाधारित कौशल्ये आत्मसात होण्यासाठी हे वर्ग आयोजित केले जातात.

खेळातून विज्ञान कार्यशाळा

विज्ञान - खेळणींच्या माध्यमातून मुलभूत संकल्पनांचे स्पष्टीकरण करणे, मुलांमध्ये निरीक्षण क्षमता वृद्धिगंत करणे तसेच विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणारा उपक्रम.

शिक्षक पालक प्रबोधन व प्रशिक्षण उपक्रम

मुलं कशी शिकतात ? शिकणं की शिकवण ? विषयांचा समवाय कसा साधावा ? ब्रेन सायन्स अँड इंटेलिजन्स ! जेंडर एज्युकेशन अँड अवेअरनेस ! इत्यादि विषयांबाबत प्रबोधन व प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.

व्याख्याने आणि चर्चासत्रे

शिक्षण, आहार, उर्जा, प्रदूषण, कचरा, अंधश्रद्धा इत्यादि दैनंदिन जीवनातील महत्वाच्या विषयांसंदर्भात व्याख्याने आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोणातून मांडणी

Scroll to Top