सामाजिक क्षेत्रात विज्ञाननिष्ठेने काम करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी विज्ञान शिक्षण माध्यमातून समाजमनात वैज्ञानिक मानसिकता रुजवणे आणि त्यासोबतच स्वयंरोजगार संधी निर्माण करणे या उद्देशाने एज्यु-प्रेन्यूअर हा उपक्रम सुरू होत आहे. वय वर्षे १८ ते ३० या वयोगटातील कोणीही युवक - युवती या प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊ शकतात. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्वयंरोजगारासाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 7080712655 वर संपर्क साधावा.